"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

चौक हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील १००% आदिवासी लोकवस्ती असलेले  प्रगतशील  गाव आहे.जामसर पैकी चौक येथे प्रसिद्ध महादेवाचे मंदिर आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १३२८ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-2 अंगणवाडी केंद्रे 3 व व्यायामशाळा ०२ ,सभामंडप- आणि बहुउद्देशीय केंद्र -०१  अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच मंदिर मंदिरेmसामुदायिक सभागृह , पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून,भात,नागलीवरई,उडीत,तुर,कुळीद ही प्रमुख पिके घेतली जातात. काजू व आंबा मोगरा. या फळ पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते

चौक ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चौक गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे.

प्रेक्षणीय स्थळे

शिव मंदिर – चौक गावातील प्रमुख जागृत महादेवाचे मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी महाशिवरात्रील

धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.व यात्रा भरवली जाते.

ग्रामपंचायत लोकनियुक्त अध्यक्ष , उपअध्यक्ष  व ०७ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात. चौक  गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

चौक हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण-२६३-१५३-००असुन त्यापैकी लागवडी योग्य  क्षेत्रफळ-१४३-११२-०० हे आर  असून व गावठण -३५-११-०० तर वर्कस- ८५-३०-०० इतके आहे.ग्रामपंचायतीमध्ये  महसूल गाव  आहेत. एकूण ३२७  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १३२८ आहे. त्यामध्ये ७९४ पुरुष  ५३४ महिला यांचा समावेश होतो.ग्रामपंचायत चौक  हद्दीत ० महसुली गावे व ० पाडे आहेत.सर्व गाव पाडे हे विखुरलेल्या स्वरूपात असून ग्रामपंचायत मुख्यालयापासून ०१ km अंतरापर्यंत वसलेले आहेत.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे.तसेच चौक  ग्रामपंचायत

गावालगत अवघ्या km किमी अंतरावर  विहिरी व बोरवेल आहेत.येथे १५.५ एक्कर चे पाझर तलाव असून १२ हि महिने पाणी या तलावाचे आटत नाही शिवाय चौक येथे उंबर विहीर हि खूप प्राशिध्द आहे पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो व मोगरा,सोनचाफा हे गाव भाजीपाला उत्पादनात प्रसिद्ध आहे . येथे हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः °से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात °से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

चौक क्षेत्रातील भाजीपाला, काजू,आंबा ,मोगरा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

प्रेक्षणीय स्थळे

शिव मंदिर – चौक गावातील प्रमुख जागृत महादेवाचे मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी महाशिवरात्रील

धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.व यात्रा भरवली जाते.

लोकजीवन

चौक  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भाजीपाला,काजू,आंबा, मोगरा व हंगामी भात,नागली,वरई उडीद, तूर पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.

गावात आदिवासी समाजाची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात हनुमान जयंती ,महाशिवरात्री भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

चौक च्या  लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

संस्कृती परंपरा

चौक गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच चौक गावात हनुमानाचा मंदिर आहे. हनुमान जयंतीला ला मोठ्या उत्साहात २  दिवस भरवली जाते त्यात प्रामुख्याने हनुमान देवाची महा पुजा केली जाते  ,तसेच महाशिवरात्रीगावातील प्रमुख जागृत महादेवाचे मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी महाशिवरात्रीला धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.व यात्रा भरवली जाते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे जामसर  गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


406
1200
625
575

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo