आमची यशोगाथा
चौक हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील १००% आदिवासी लोकवस्ती असलेले प्रगतशील गाव आहे.जामसर पैकी चौक येथे प्रसिद्ध महादेवाचे मंदिर आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १३२८ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-2 अंगणवाडी केंद्रे ०3 व व्यायामशाळा ०२ ,सभामंडप-२ आणि बहुउद्देशीय केंद्र -०१ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ०१ मंदिर मंदिरेmसामुदायिक सभागृह ०१, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून,भात,नागली व वरई,उडीत,तुर,कुळीद ही प्रमुख पिके घेतली जातात. काजू व आंबा मोगरा. या फळ पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते
चौक ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चौक गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे.
प्रेक्षणीय स्थळे
शिव मंदिर – चौक गावातील प्रमुख जागृत महादेवाचे मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी महाशिवरात्रील
धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.व यात्रा भरवली जाते.
ग्रामपंचायत लोकनियुक्त अध्यक्ष , उपअध्यक्ष व ०७ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात. चौक गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
चौक हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण-२६३-१५३-००असुन त्यापैकी लागवडी योग्य क्षेत्रफळ-१४३-११२-०० हे आर असून व गावठण -३५-११-०० तर वर्कस- ८५-३०-०० इतके आहे.ग्रामपंचायतीमध्ये ०५ महसूल गाव आहेत. एकूण ३२७ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १३२८ आहे. त्यामध्ये ७९४ पुरुष व ५३४ महिला यांचा समावेश होतो.ग्रामपंचायत चौक हद्दीत ०१ महसुली गावे व ०५ पाडे आहेत.सर्व गाव पाडे हे विखुरलेल्या स्वरूपात असून ग्रामपंचायत मुख्यालयापासून ०१ km अंतरापर्यंत वसलेले आहेत.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे.तसेच चौक ग्रामपंचायत
गावालगत अवघ्या १km किमी अंतरावर विहिरी व बोरवेल आहेत.येथे १५.५ एक्कर चे पाझर तलाव असून १२ हि महिने पाणी या तलावाचे आटत नाही शिवाय चौक येथे उंबर विहीर हि खूप प्राशिध्द आहे पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो व मोगरा,सोनचाफा हे गाव भाजीपाला उत्पादनात प्रसिद्ध आहे . येथे हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १८°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
चौक क्षेत्रातील भाजीपाला, काजू,आंबा ,मोगरा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
प्रेक्षणीय स्थळे
शिव मंदिर – चौक गावातील प्रमुख जागृत महादेवाचे मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी महाशिवरात्रील
धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.व यात्रा भरवली जाते.